breaking-newsआंतरराष्टीय

आखाती देशांसाठीचे ‘चालक प्रशिक्षण केंद्र’ भारतात

दुबई: आखाती देशांमध्ये भारतीय चालकांना असलेली मागणी लक्षात घेऊन संयुक्त अरब अमिराती आणि भारत संयुक्तपणे भारतात ‘चालक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करणार आहेत. या प्रशिक्षण केंद्रामुळे आखाती देशात गेल्यावर चालकाला डाव्या बाजूने वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा वेळ वाचणार आहे.

भारतात गाडय़ांचे स्टीअिरग उजव्या बाजूला असते, तर आखाती देशांतील गाडय़ांचे स्टिअिरग डाव्या बाजूला. त्यामुळे भारतातून आखाती देशांमध्ये चालक म्हणून जाणाऱ्यांना तेथे गेल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागते. यात त्यांना नोकरीवर घेणाऱ्या कंपनीचा आणि चालक म्हणून गेलेल्यांचा वेळ आणि तिथे नव्याने चालक परवाना काढण्याचा पैसाही वाया जातो. तसे होऊ नये म्हणून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.

भारतात ही चालक प्रशिक्षण केंद्रे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत इमिरेट्स ड्रायव्हिंग इन्स्टिटय़ूट (ईडीआय) आणि युथ चेंबर ऑफ कॉमर्स, युएई (वायसीसी) हे संयुक्तपणे राबवणार आहेत. सुरुवातीला ही केंद्रे उत्तर प्रदेश, केरळ, पंजाब, झारखंड आणि आंध्र प्रदेश येथे उघडण्यात येतील.

या केंद्रांद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून ते आखाती देशांत गेल्यावर कोणतीही चाचणी न घेता तेथील अधिक दर्जेदार प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. तसेच त्यांचा वेळ आणि पैसा अधिक खर्च न होता त्यांना परवाना मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button