breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीने घेतला अचानक पेट

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

चिंचवड गावातून आकुर्डीकडे जाणा-या रस्त्यावर आज एका दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यामुळे सर्वांची एकच धावपळ झाली. प्रसंगावधान पाहून चालकाने गाडी सोडून दिल्याने तो थोडक्यात बचावला आहे. संपुर्ण गाडी जळून खाक झाली आहे. ही घटना सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

रमेश पाचपुते हे दुचाकी घेऊन आकुर्डी कडे जात होते. इंदिरा नगर चौकात येताच त्यांच्या सी डी डीलक्स (एमएच १४ डीजी ६२०१) या दुचाकीने अचानक पेट घेतला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही क्षणातच आगीच्या ज्वाला निघू लागल्या.प्रसंगावधान पाहून पाचपुते यांनी गाडी सोडून पळ काढला.भर रस्त्यात पेटलेली गाडी पाहून अनेकांची धावपळ झाली.रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली.पेटलेली गाडी काही क्षणात खाक झाली.घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढत गेली.अनेक जण पेटलेल्या गाडीचे चित्रीकरण करत होते.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी हजर झाले.पेटलेल्या गाडीवर नियंत्रण मिळे पर्यंत गाडी संपूर्ण जळून खाक झाली होती.सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button