breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आई – बापाची लेकरासाठी दुनियादारी

 विशेष मुलांच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास

 व्हाय मी… सांग ना आई मला या अल्बमचे प्रकाशन 

पिंपरी – विशेष मुलगा असलेला पृथ्वीराज इंगळे हा अवघा 14 वर्षांचा आहे… तो गातो ही छान, त्याला गाण्याची चांगली समज आहे, त्या मुलांला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आई – वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली तर पृथ्वीराजच्या अथक प्रयत्नामूळे त्याला गाण्याचे सूर गवसले आहेत. या स्वरांचा अविष्कार असलेला व्हाय मी… सांग ना आई मला या अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बहिणाबाई चाैधरी चॅरिटेबल ट्रस्ट व पृथ्वीराज थिएटर यांच्यावतीने पृथ्वीराजने गायलेल्या व्हाय मी सांग ना आई मला या अल्बमचे प्रकाशन समारंभ  नूकताच कार्यक्रम पार पडला. यावेळी किरण खडके, अभिनेता पार्थ भालेराव, संगीत संयोजक विवेक परांजपे, दीपक महाजन, दया इंगळे, सतीश इंगळे उपस्थित होते. पृथ्वीराजने सादर केलेल्या व्हाय मी … सांग ना आई मला या गीताने उपस्थित प्रेक्षक भारावले. याप्रसंगी पृथ्वीराजचा अविष्कार पाहून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे चाैकट राजाच्या आठवणींमध्ये हरखून गेले.

चाैकट राजा चित्रपटात दिलीप प्रभावळकरांनी अजरामर केलेली नंदू या विशेष मुलाची भूमिका आणि त्यांच्या अदाकाराने मी असा कसा, असा कसा, वेगळा वेगळा  हे सजलेले गाणे मराठी रसिकांच्या मनावर अाजही कोरलेले आहे. विशेष मुलांच्या या जिद्दीच्या आठवणी आणि पृथ्वीराज इंगळे या विशेष मुलाने केलेल्या प्रयत्नांची कहाणी एेकून सिनेमातील चाैकट राजा ही भारावून गेला.

पृथ्वीराजची गाणी एेकून मी थक्क झालाे आहे. त्यांच्या आई – वडिलांनी त्यांच्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत. चाैकट राजा चित्रपटात विशेष मुलाची भूमिका साकारताना मला कमी वेळ मिळाला. चित्रपटातील नंदू पुढे चित्रकलेत प्राविण्य मिळवतो. त्याला पुरस्कार मिळू लागतात. पण ते कल्पनेतील विश्व होते. परंतू, पृथ्वीराजच्या रुपाने ते मी आज सत्यात अनुभवतोय. त्याचा गळा आणि ज्ञान खरे आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे. विशेष मुलांना व पालकांना उमेद मिळू दे

दिलीप प्रभावळकर – ज्येष्ठ अभिनेते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button