breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आईसह पाचजणांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

बुलडाणा|महाईन्यूज|

एकाच कुटुंबातील 5 व्यक्तिचे विहिरीत मृतदेह सापडले आहेत. बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथे ही धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये आईसह चार मुलींचा समावेश आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास सुरु आहे. मात्र चार स्त्रियांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये आई उज्वला ढोके (वय – 35), मुलगी वैष्णवी ढोके (वय 9), दुर्गा ढोके (वय 7), आरुषी ढोके (वय 4) आणि  पल्लवी ढोके (वय 1) यांचा समावेश आहे.

आज सकाळी हे मृतदेह गावाबाहेरच्या विहिरीत सापडले. काल हे कुटुंब शेतात गेलं होतं. मात्र ते घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरु होती. अखेर आज सकाळी त्यांचे मृतदेह विहिरीत तरंगताना दिसले.

दरम्यान, महिलेच्या पतीचे महिनाभरापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे त्या विवंचनेतून या महिलेने आयुष्य संपवलं की काय असा प्रश्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button