breaking-newsपिंपरी / चिंचवड
आईशी भांडण झाल्याने मुलीने सोडले घर
दिघी – आईसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावरून रागावलेली मुलगी आई-वडिलांचे घर सोडून निघून गेली आहे. हा प्रकार दिघी येथे गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेचारच्या सुमारास घडला.
सुनीता परांडे (वय-39, रा. दिघी गावठाण, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. श्वेता काळुराम परांडे (वय-17) असे घर सोडून गेलेल्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता आणि त्यांची मुलगी श्वेता यांच्यामध्ये घरातील किरकोळ कारणावरून गुरुवारी दुपारी भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून श्वेता अचानक दुपारी साडेचारच्या सुमारास घरातून निघून गेली. मात्र, तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय श्वेताच्या घरच्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.