breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंबेनळी घाटात 200 फूट खोल दरीत कोसळला ट्रक

सातारा – अंबेनळी घाटात 200 फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची घटना समोर आली आहे. ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराने प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारल्यामुळे अनर्थ टळला. ट्रकमध्ये साखरेची पोती असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. पोलादपूर ते प्रतापगड घाटातील ही घटना आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या टीमने घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

आंबेनळी घाट हा साधारण हजार ते बाराशे फूट खोल आहे. परंतु चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कोसळून सुमारे 200 फूट खोलीवर अडकला. घटनास्थळी पोलीस आणि ट्रेकर्स पोहोचले आहेत. ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकचालक आणि क्लिनरला नियंत्रण सुटत असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी ट्रक दरीत कोसळण्याआधीच दोघांनी बाहेर उडी घेतली. यामुळे दोघे जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button