breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आंदोलनापूर्वीच मनसे शहराध्यक्ष चिखले, माजी नगरसेवक भापकर पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरी-चिंचवडमध्ये सभा होणार आहे. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. म्हणून मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले हे कार्यकर्त्यांसमवेत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आंदोलन करणार होते. मात्र, आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, माजी नगरसेवक मारुती भापकर यांचाही या धरणे आंदोलनात सहभाग असल्याने त्यांना तर त्यांच्या राहत्या घरीच स्थानबध्द केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.