breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना पुन्हा सीबीआय कोठडी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना विशेष न्यायालयाने पुन्हा २३ जूनपर्यंत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी  दिले.

अ‍ॅड. पुनाळेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात अर्ज सादर केला होता. दरम्यान, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अ‍ॅड. पुनाळेकर यांना पुन्हा सीबीआय कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. सीबीआयकडून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी बाजू मांडली. अ‍ॅड. पुनाळेकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये काही महत्त्वाची मिळाली आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या मजकुरात (फोल्डर) डॉ. दाभोलकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. डॉ. दाभोलकर यांना २०१२ मध्ये अ‍ॅड. पुनाळेकर यांनी पाठविलेले पत्र सीबीआयला मिळाले असल्याचे अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी सांगितले.

अ‍ॅड. पुनाळेकर यांच्याकडून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. अ‍ॅड. पुनाळेकर यांच्याकडे तपास करायचा असल्याने त्यांना सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी विनंती अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी युक्तिवादात केली. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) संशयिताला अटक केल्यास त्याचा तपासासाठी  तीस दिवसांच्या कालावधीत पुन्हा ताबा मागण्यात येऊ  शकतो, असे सीबीआयच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. अ‍ॅड. पुनाळेकर यांच्यावतीने अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अ‍ॅड. धर्मराज चंदेल यांनी बाजू मांडली. सीबीआयकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाला त्यांनी विरोध केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button