breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अॅाटो क्लस्टर सभागृहासमोर जाळला कचरा

पिंपरी – शासनाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॅस्टीक बंदीचा निर्णय घेतला. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार होत आहेत. चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहासमोर चक्क आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच कचरा जाळला आहे. याकडे संबंधिताना दुर्लक्ष केले आहे. 

महापालिकेच्या चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहातील कचरा सभागृहाच्या परिसरातच जाळण्याचा प्रकार रविवारी (दि. 24) समोर आला. विशेष म्हणजे कचरा जाळणारे दुसरे-तिसरे कोणीही नसून महापलिकेचे कर्मचाऱ्यांनीच हा कचरा जाळल्याचा आरोप महापालिकेच्या आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड. सागर चरण यांनी केला आहे. याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाजवळच हा प्रकार घडत असल्याबद्दल अॅड. चरण यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. महापालिकेला कचरा जाळण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल करत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळेच कचरा गोळा करुन तो कचरा डेपोपर्यंत नेऊन त्याची वाहतूक करण्याऐवजी तो जाळून विल्हेवाट लावण्याचा शॉर्टकट अवलंबला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button