breaking-newsराष्ट्रिय

अहमदाबाद आत्महत्या: घरात पतीच्या प्रेयसीचं भूत वावरत आहे, पत्नीची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती

अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केलेल्या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. बुधवारी राहत्या घरात तिघांचे मृतदेह आढळले होते. कुणाल त्रिवेदी, कविता त्रिवेदी आणि 16 वर्षीय मुलगी शिरीन अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांच्या हाती कविता त्रिवेदी यांची सुसाइड नोट लागली असून त्यामध्ये कुणाल त्रिवेदी यांच्या प्रेयसीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतीच्या माजी प्रेयसीचं भूत कुटुंबाला त्रास देत असल्याचं कविता यांनी नोटमध्ये म्हटलं आहे.

याआधी घरात सापडलेल्या नोटमध्ये कुटुंबाने आपण काळ्या जादूच्या प्रभावाखाली असल्याचा दावा केला होता. यावरुन पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज लावला होता. ही नोट कुणाल यांनी लिहिलेली होती.

४५ वर्षीय कुणाल यांनी गळफास घेताल होता. पत्नी कविता आणि मुलगी शिरीन यांचेही मृतदेह घरात सापडले होते. या दोघींनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कुणाल यांची आई बेशुद्धावस्थेत सापडली होती. त्यांनीही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र यातून त्या बचावल्या. २४ तासांपासून त्रिवेदी कुटुंबाचे घर बंद होते. त्यांचे नातेवाईकही त्यांना बराच वेळ फोन करत होते मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे नातेवाईक पोलिसांना घेऊन थेट त्रिवेदी यांच्या घरी पोहोचले. घरी पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला.

कुणाल यांनी आपल्या नोटमध्ये लिहिलं होतं की, मला आणि माझ्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची कोणतीही इच्छा नव्हती. पण काळ्या जादूचा प्रभाव कमी होणं शक्य नसल्याने दुसरा पर्याय शिल्लक नाही. दरम्यान तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अजून एक नोट लागली आहे जी कविता यांनी लिहिली आहे. ही नोट त्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी लिहिली होती.

८ सप्टेंबर रोजी कविता यांनी आपल्या ड्रायव्हरला तीन बॅगांसहित बहिणीच्या घरी पाठवलं होतं. यामध्ये कपडे, सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम होती. या सगळ्याची किंमत १० लाख रुपये आहे. पोलिसांना संशय आहे की, कुटुंबाने आधीच आत्महत्या करण्याच ठरवलं होतं. त्यामुळेच त्यांनी आपल्याकडील महत्त्वाच्या गोष्टी बहिणीच्या घऱी पाठवून दिल्या होत्या.

काय आहे कविता यांच्या सुसाइड नोटमध्ये ?
कविता यांनी नोटमध्ये लिहिलं आहे की, कुणाल यांना आपल्या माजी प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबाने त्यांच्या नात्याला नकार दिला होता. यामुळे नाराज झालेल्या कुणाल यांच्या प्रेयसीने आत्महत्या केली. तेव्हापासून प्रेयसीचं भूत आपल्या मागे लागलं असल्याचं कुणाल यांना वाटत होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button