breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगर महापालिका निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दरम्यान निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. अशोक पांडुरंग सूर्यवंशी असे या मृत निवडणूक कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अहमदनगर सावेडी निवडणूक कार्यालयात बांधकाम विभागातील अशोक पांडुरंग सूर्यवंशी हे निवडणूक ड्युटीवर कार्यरत होते. सूर्यवंशी यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सकाळी सावेडी परिसरातील मतदान कार्यालयाच्या पायऱ्यांवर झोपलेले होते. बराच वेळ ते अशाच अवस्थेत झोपले असल्याचे लक्षात येताच इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही आहे, हे लक्षात येताच तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना बोलवले. यावेळी सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button