breaking-newsमहाराष्ट्र

अहमदनगर : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची तिच्याच घरी आत्महत्या

अहमदनगरमध्ये प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने तिच्याच घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील मानोरी येथे १५ जून रोजी दुपारी ही घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरद चव्हाण (वय ३१ रा, बऱ्हाणपूर ता. नेवासा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो  शिर्डी-शिंगणापूर रोडवर वाहनचालक म्हणून काम करायचा. याबाबत मृत प्रियकराच्या भावाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, ‘शरदचे आणि मानोरी येथे राहणाऱ्या एका तरुणीचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या तरुणीने शरदविरोधात यापूर्वीही अत्याचार केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतरही ती घरी येऊन आम्हास शिवीगाळ करून बदनामी करत होती. प्रकरण मिटवण्यासाठी ती दीड लाख रूपयांची मागणी करत होती. त्यावर माझ्या आईने २०१८ साली तिच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही ती शरदला वारंवार फोन करुन पैशाची मागणी करायची आणि सोबत रहा असा आग्रह धरत होती़, त्यासाठी घरी येऊन त्रास द्यायची’.

तिच्या त्रासाला कंटाळून अखेर दिनांक १५ जून रोजी दुपारच्या सुमारास शरद याने मानोरी येथे तिच्या मानोरी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तरुणीला गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button