breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

असह्य उन्हाळ्यामुळे पुणेकर त्रस्त, सिग्नलवर टाकले नेटचे छप्पर

पुणे – कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभाग आणि सतत वर्दळीचा फरासखाना चौकात अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. ती म्हणजे हजारो वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळावी. यासाठी सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत. वाहनचालकांची अशा प्रकारे काळजी घेतल्याने पुणेकर नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात फरासखाना चौक, अप्पा बळवंत चौक, सिटी पोस्ट चौक येथील सात सिग्नलवर थांबणा-या वाहनचालकांसाठी कापडी छप्परची सोय करण्यात आली आहे.

यावेळी हेमंत रासने म्हणाले की, मागील काही दिवसामध्ये शहराचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नलकरीता चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होत आहे.त्यामुळे कापडी छप्पर सिग्नलच्या जवळ लावण्यात आले. आता येत्या काळात शहरातील विविध भागात कापडी छप्पर लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, फरासखाना चौकात 60 बाय 40 आणि 50 बाय 30 आकाराच्या हिरव्या कापडाचे छप्पर, अप्पा बळवंत चौकामध्ये 30 बाय 20, 20 बाय 20 आणि 40 बाय 20 आकाराचे छप्पर तसेच सिटी पोस्ट चौकामध्ये 60 बाय 30 आणि 40 बाय 20 आकाराचे छप्पर लावण्यात आले आहे. प्रत्येकी तीन फूट रुंदीचे कापड शिवण्यात आले आहे. त्या माध्यमातुन मोठे छप्पर तयार करण्यात आले आहे. तसेच 12 आणि 4 एमएम आकारच्या दो-यांचा वापर करुन हे छप्पर बांधण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button