breaking-newsताज्या घडामोडीपुणे

असह्य उन्हामूळे पिंपरी चिंचवडकर हैराण

पिंपरी – सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. रस्त्यांवर अक्षरश: शुकशुकाट दिसून येतो. कडक उन्हामुळे शहरवासीयांच्या दैनंदिन जीवनावर चांगलाच परिणाम झाला आहे. शहराच्या विविध भागातील बाजारपेठा दुपारी आेल पडल्या आहेत. लग्नसराई तोंडावर येवूनही बाजारपेठ मात्र थंडावल्याचे चित्र आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस उन्हाळा असह्य होत चालला आहे. एप्रिलमध्येच ही अवस्था तर मेमध्ये काय चित्र असेल, अशी धास्ती शहरवासीयांना आहे. सकाळी आठ वाजताच उन्हाचे चटके जाणवतात. अकरानंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवते. परिणामी दुपारी अकरा ते सायंकाळी पाच, साडेपाचपर्यंत बाजारपेठा ओस पडत आहेत.

पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, भोसरी, दापोडी, आकुर्डी, रावेत, चिखली, किवळे, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडी, निगडी आदी भागात कायम वर्दळीच्या असलेल्या बाजारपेठा आेस असल्याचे पाहावयास मिळत आहेत. सकाळी खरेदी लवकर आटोपती घेऊन अनेक जण घरचा रस्ता धरतात. सकाळच्या वेळी टपऱ्या, उपहारगृहांभोवती दिसणारी गर्दी देखील लवकर आटोपते घेत असल्याचे दिसत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button