breaking-newsमहाराष्ट्र

असदुद्दीन ओवेसी यांचा नाच पाहून व्हाल थक्क!

AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट या ठिकाणी रॅलीनंतर एक नाच करुन उपस्थितांची मनं जिंकली. ‘मियाँ मियाँ भाई’ या गाण्यावर त्यांनी नाच केला. त्यांची ही डान्स स्टेप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होतो आहे. पैठण गेट या ठिकाणी असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती. या सभेनंतर हार घेऊन खाली उतरत असताना त्यांनी ही डान्स स्टेप केली आणि उपस्थितांची मनं जिंकली.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरु आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. त्यामुळे आज संध्याकाळच्या आत विविध प्रचारसभाही रंगणार आहेत. अशात आता शऱद पवार आणि रोहित पवार यांचं पावसात भिजून भाषण करणं असेल, राहुल गांधी यांचं क्रिकेट खेळणं असेल हे सगळं गाजतंय. त्याता आता असदुद्दीन ओवेसी यांचीही भर पडली आहे. ओवेसी हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी कायम ओळखले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button