breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अशोक चव्हाण कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई | काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे अशोक चव्हाण यांना २५ मे रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून अशोक चव्हाण यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर तब्बल आठवडाभरानंतर अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे.

२४ मे  रोजी अशोक चव्हाण यांचा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर चव्हाण यांना रुग्णवाहिकेने नांदेडवरून मुंबईत आणण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्री योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठका किंवा इतर बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पाडल्या जात आहेत. तर प्रत्यक्ष होणाऱ्या बैठकीमध्येही कमी उपस्थिती आणि योग्य ते अंतर पाळलं जात आहे. एवढं करूनही मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button