breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

मुंबई – कोरोनाचं संकट ओढावल्यानं सोन्याच्या भाव सध्या गगनाला भिडलेयत. त्यात लग्नसराईचे दिवस जवळ आल्यानं सोनं खरेदीसाठी लोकं गर्दी करतायत. अशावेळी सोन्याच्या किंमती कमी असाव्यात ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण प्रत्यक्षात ते शक्य नसलं तरी फोन पे तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलंय.

सध्याच्या काळात सोनं खरेदी देखील ऑनलाईन झालीय. कोणताही ग्राहक एक रुपयांपासून सोनं खरेदीची सुरुवात करु शकतो. फोन पेने यासंदरभात माहिती दिली. ३५ टक्के शेअर्ससोबत सोनं खरेदी करण्यासाठी भारतात सर्वात मोठा डिजीटल प्लॅटफॉर्म बनल्याचे फोन पेने सांगितले. यावर्षी दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सणांच्या दिवसांत त्यांच्या माध्यमातून झालेल्या सोने विक्रीत ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे देखील फोन पे ने म्हटलंय.

डिसेंबर २९१७ मध्ये फोन पे सोनं कॅटेगरी सुरु केली आणि गेल्या ३ वर्षांपासून सेफ गोल्ड आणि एमएमटीसी-पीएएमपीसोबत भागीदारी केली. यामुळे देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन सोनं खरेदी करता येते. फोन पे वर खरेदी केलेलं सोनं हे २४ कॅरेटचं असली सोनं असतं. जे ग्राहकांच्या बजेटनुसार कधीही खरेदी केलं जाऊ शकतं. याची किंमत १ रुपयांपासून सुरु होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button