breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अवकाळी पावसाच्या‌‌ संकेतापोटी नालेसफाईला गती, भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयुक्तांना सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सद्या अवकाळी पावसाची शक्यता विचारात घेता पिंपरी-चिंचवड शहरात नाल्यांची आणि स्टॉर्म वॉटर चेंबर, लाईनची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याची आवश्यकता असुन त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने महापालिका प्रशासनातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे.

शहरातील नाल्यांचे काँक्रीटीकरण झाले असले, तरी नाल्यांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. झाडांच्या फांद्या, वाढलेले गवत, चेंबरवर नसलेले झाकण, तर काही ठिकाणी टाकलेला मातीचा भराव यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला अडथळा होऊन रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता विचारात घेता स्टॉर्म वॉटर लाइनच्या चेंबर तसेच नाल्यामध्ये माती व कचरा पडल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो.

त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून घाणीचे साम्राज्य व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवु नये यासाठी पावसाळयापूर्वी सर्व स्टॉर्म वॉटर लाइनचे चेंबर व सर्व नाल्यांची साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती सभागृह नेता नामदेव ढाके यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button