breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाने मशिदीत लपलेल्या 2 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

श्रीनगर | जम्मू-काश्मिरच्या अवंतीपोरामध्ये शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. अवंतीपोराच्या मेज पम्पोरमध्ये गुरुवारी एन्काउंटरमध्ये एक दहशतवादी मारला गेला. तर इतर दोन दहशतवादी हे मशिदीत लपले होते. शुक्रवारी सकाळी दोघांनाही कंठस्नान घालण्यात आले. आतापर्यंत येथे तीन दहशतवादी ठार झाले आहेत.  जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी शुक्रवारी सकाळी दहशदवादी मारले असल्याची माहिती दिली. पम्पोरच्या मेज परिसरात एका इनपूटनंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. याच दरम्यान दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केली होती. सुरक्षादलाने एका दहशतवाद्याला मारले होते.

मात्र इतर दहशतवादी जामा मशिदीत लपले होते. या मशिदीचा कॅम्पस खूप मोठा आहे. दहशदवाद्यांना ठार करायला सुरक्षा दलाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. तर शोपियांच्या मुनांदमध्येही गुरुवारी एका दहशतवाद्याला ठार करण्यातआले होते. मुनांदमध्ये अजुनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.  अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला अटक तर दुसरीकडे दक्षिणी काश्मिरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी सुरक्षादलाने एका दहशतवाद्याला अटकही केली. त्याच्याकडून हत्यार आणि स्फोटक हस्तगत करण्यात आले आहेत. न्यूज एजेंसीच्या सूत्रांनुसार, पकडण्यात आलेला दहशतवादी हा कुगामच्या रेदवानीचा इमरान डार आहे. तो नुकताच दहशतवादी संघटनेत सामिल झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button