अलिया करणार बॉलिवूडची महिला क्रिकेट टीम
अलिया भट सध्या आगामी “राजी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनदरम्यान आलियाला विचारले गेले की, जर बॉलिवूडमधील सगळ्या अभिनेत्रींची मिळून एक क्रिकेट टीम बनवली, तर त्यामध्ये कोणकोणत्या ऍक्ट्रेसला घ्यायला आवडेल. यावर उत्तर देताना आलियाने या बॉलिवूड आयडियल वुमन क्रिकेट टीमची कॅप्टन अनुष्का शर्मा असेल, असे सांगितले. अनुष्काशिवाय कंगणा रणावत उत्तम ऑलराऊंडर असेल. तर कतरिना कैफ उत्तम फिल्डर असेल, असे अलिया म्हणाली. एवढेच नाही तर या वुमन्स टीमचे नावही “छान मुलगी’ असेल असे अलियाने ठरवून टाकले आहे.
नेहमीच बिनधास्त असलेल्या अलियाला आपल्या या आयडियल क्रिकेट टीमला वास्तवात आणण्याचीही महत्वाकांक्षा आहे. “राजी’व्यतिरिक्त रणवीर सिंहबरोबर “गली ब्यॉय’च्या शुटिंगमध्येही ती व्यस्त आहे. याशिवाय संजय लिला भन्साळींच्या एका सिनेमाचेही काम तिच्याकडे आहे, असे समजते आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आणि शायर साहिर लुधियानवी यांच्या जीवनावरचा चित्रपट बनवण्याचे भन्साळींनी ठरवले आहे, असे समजते आहे. एवढे चित्रपट करत असताना अलियाला क्रिकेट टीम बनवायला अलियाला वेळ कोठून मिळणार. त्यापेक्षा “आयपीएल’ बघण्यात तिने आनंद मानावा.