breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये भारतीय व्यक्तींवर हल्ल्याची घटना पुन्हा एकदा घडली असून, अमेरिकेतील कन्सास शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मृत विद्यार्थ्याची ओळख शरत कोपू अशी झाली असून, तो तेलगांणामधील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होती.

शरत हा युनिव्हर्सिटी ऑफ मिजोरी-कंन्सास सिटीमध्ये शिकत होता. शरतचा चुलत भाऊ संदीप वेमुलाकोंडा याने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अज्ञात हल्लेखोरांच्या एका टोळक्याने कन्सासमधील एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार केला. ज्यामध्ये शरत याला पाच गोळ्या लागल्या.

दरम्यान कन्सास सिटी पोलिसांनी हा हत्या आणि लुटीचा प्रकार असल्याचे सांगितले. तसेच संशयित हल्लेखोराचा व्हिडीओ जारी करून पोलिसांनी हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्यास 10 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. याआधी गतवर्षी 2017 साली फेब्रुवारी महिन्यात श्रीनिवास कुचिभोटला या भारतीय तरुणाची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button