breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत सात दशकांनंतर प्रथमच महिलेला मृत्यूदंड, कारणही तसंच

अमेरिकेतील कन्सास प्रांतातील एका महिलेला बुधवारी मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. एखाद्या महिलेला मृत्यूदंड देण्याची घटना अमेरिकेत सुमारे सात दशकांनंतर प्रथमच घडली आहे. या आधी 1953 साली महिलेला शेवटचा मृत्यूदंड देण्यात आला होता.

आज मृत्यूदंड देण्यात आलेल्या महिलेचे नाव लिसा मोंटोगॉमेरी असे आहे, ती 52 वर्षांची होती. आज पहाटे 1 वाजून 31 मिनीटांनी तिला इंजेक्‍शन देऊन मृत्यूदंड देण्यात आला. इंडियाना प्रांतातील कारागृहात या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.

आरोपी महिलांनी एका गर्भवती डॉग ब्रिडरची हत्या करुन तिचं पोट कापून तिच्या बाळाला बाहेर काढलं होतं. त्यानंतर ती घटनास्थळावरुन फरार झाली होती. अमेरिकेच्या फेडरल अधिकाऱ्यांद्वारे कुठल्या महिलेला सात दशकांमध्ये पहिल्यांदा मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अमेरिकेत 1953 मध्ये एका महिलेला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली होतीय ती अखेरची होती. त्यामुळे या न्यायालयाच्या या निर्णयाची चर्चा होत आहे. मोंटगोमरीने 2004 मध्ये एका 23 वर्षीय गर्भवती महिला जो स्टिनेटची दोरीने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आरोपीने स्टिनेटचं पोट कापलं आणि तिच्या आजन्म बाळाला बाहेर काढलं आणि त्या बाळाला घेवून ती पसार झाली. पण, पोलिसांनी घटनेचं गांभिर्य लक्षात घेता तात्काळ लिसाला अटक केली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button