breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेतील भारतीयाच्या हत्येबद्दल माजी नौदल कर्मचाऱ्याला जन्मठेप

वॉशिंग्टन – अमेरिकेत कार्यरत असलेले भारतीय अभियंते श्रीनिवास कुचीभोतला यांची वांशिक विद्वेशातून हत्या केल्याच्या आरोपावरून कंसास शहरातील नौदलाचे माजी कर्मचारी ऍडम पुरींतोन वय 52 यांना तेथील स्थानिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

गेल्यावर्षीै 22 फेब्रुवारीला एका बार मध्ये श्रीनिवास यांची त्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यांनी केलेल्या गोळीबारात श्रीनिवास यांचा मित्र अलोक मदसानी हाही जखमी झाला होता. माझ्या देशातून निघून जा असे ओरडत त्यांनी श्रीनिवास यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तेथून ते पळत जात असताना तेथे असलेल्या एका इसमाने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे अन्य दोन जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या कारणावरूनही ऍडम यांना 165 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या निकालाबद्दल श्रीनिवास यांच्या पत्नी सुनयना दुमाला यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या निकालामुळे माझे पती परत येणार नाहींत पण या निकालाने एक संदेश मात्र ठळकपणे सर्वांपुढे गेला आहे तो म्हणजे वांशिक विद्वेष कदापिही मान्य केला जाणार नाही. त्यांनी पोलीस यंत्रणेचेही आरोपीला न्यायापुढे खेचल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button