breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेकडून इराणची कोंडी; धातूंच्या निर्यातीवर प्रतिबंध

अमेरिकेने बुधवारी इराणवर नवे प्रवतिबंध लावले. यामध्ये लोखंड, स्टील, अॅल्युमिनिअम आणि तांब्याच्या निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेच्या या प्रतिबंधांनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोखंड, स्टील, अॅल्युमिनिअम आणि तांब्याची निर्यात इराणने बंद करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. नॉन पेट्रोलिअम पदार्थांनंतर इराणला सर्वाधिक महसूल याच धातूंच्या निर्यातीतून मिळतो. त्यामुळे धातूंची निर्यात करुन इराणचा महसूल कमी करणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगत अन्य देशांनीही इराणकडून निर्यात होणाऱ्या या धातूंना आपल्या बंदरांवर उतरू देऊ नये, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या धातूंच्या निर्यातीतून मिळणारा महसूल हत्यारांची खरेदी, दहशतवादी गटांना मदत करण्यासाठी आणि सैन्यदलाच्या विस्तारासाठी वापर केला जाऊ शकतो, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. इराणने बुधवारी 2015 सालच्या अण्विक करारातील काही अटी मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर अमेरिकेने नवे निर्बंध लावण्याची घोषणा केली.

यापूर्वी काही देशांना इराणकडून कच्च्या तेलाची आयात करण्याची सुट दिली होती. परंतु गेल्याच महिन्यात अमेरिकेने यापुढे सुट देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यातच दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने मीडल इस्टमध्ये आपल्या नौदलाला पाचारण केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी इराणला इराशा दिला होता. तसेच अमेरिका किंवा अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास इराणला अमेरिकेचा सामना करावा लागेल. आम्ही इराणबरोबर युद्ध करू इच्छीत नाही. परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार असल्याचेही बोल्टन यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button