breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिका नसली, तरी इराण आण्विक करार चालूच राहणार – फ्रान्स

पॅरिस (फ्रान्स) – अमेरिका आण्विक करारातून बाहेर पडली असली, तरी इराण आण्विक करार चालूच राहणार असल्याचा विश्‍वास फ्रान्सने दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी इराण आण्विक करारतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्यामुळे इराण आण्विक करार रद्दबातल होत नसल्याची ग्वाही फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ली ड्रायन यांनी दिली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन या बाबतीत इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांच्याशी नंतर चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जागतिक शक्तींबरोबर इराणने सन 2015 मध्ये जो करार केलेला आहे, तो इराणला मान्य असून तो चालू ठेवण्याची फ्रान्सची इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. करारातून अमेरिकेने अंग काढून घेतले असले, तरी त्यामुळे या विभागाचा समतोल बिघडणार नाही, याकडे पाहिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

सन 2015 मध्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, रशिया, चीन आणि इराण यांच्यात करार झाला होता. या करारानंतर इराणवरील निर्बंध काढून घेण्यात आले होते. बदल्यात इराणने आपला आण्विक कार्यक्रम मर्यादित ठेवण्याचे मान्य केले होते. इराणला अणुबॉंब करण्यापासून रोखणे हाच या कराराचा मुख्य उद्देश होता
उलट हा करार एकतर्फी असून आपण त्या करारातून बाहेर पडत असल्याचे आणि त्याचबरोबर इराणवर आर्थिक निर्बंध लागू करणार असल्याचेही डोनॉल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले आहे. हा करार करायलाच नको होता, अशी पुस्तीही ट्रम्प यांनी जोडली आहे.

ट्रम्प यांचा आण्विक करारातून बाहेर पडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट करून अमेरिकेने स्वत:ला जगाचा आर्थिक पोलीस समजू नये असा टोला फ्रान्सचे अर्थमंत्री ब्रुनो ल मायरे यांनी हाणला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button