breaking-newsराष्ट्रिय

अमित शाह यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

Sohrabuddin Shaikh Case: सोहराबुद्दीन चकमकीप्रकरणी मुंबई हायकोर्टाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिलासा दिला. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांकडे ठोस मुद्दाच नाही, असे सांगत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये अमित शहा यांना खटल्यातून दोषमुक्त केले होते. या निर्णयाला सीबीआयने वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले नव्हते. सीबीआयच्या या भूमिकेविरोधात ‘बॉम्बे लॉयर्स असोसिएशन’ने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सीबीआयला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावे, असे या याचिकेत म्हटले होते. मात्र, हायकोर्टाने ही याचिकाच फेटाळल्याने अमित शाहांना दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?
सोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा ठपका होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर २००५ मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. या बनावट चकमकीचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा सहभाग होता, असा आरोप होता. डिसेंबर २०१४ मध्ये न्यायालयाने अमित शहा यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button