breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमित शहा तपासणार आमदारांचे प्रगतिपुस्तक

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शहा हे 5 आणि 6 एप्रिल रोजी मुंबईत येत असून, या दौर्‍यात ते भाजपचे मंत्री आणि आमदारांचे प्रगतिपुस्तक तपासणार आहेत. लोकसभा आणि त्यानंतर लगेचच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याद‍ृष्टीने मंत्री आणि आमदारांची कामगिरी तपासली जाणार आहे. 6 एप्रिल रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील महामेळावा संपताच ही बैठक होणार आहे.

महामेळाव्यासाठी अमित शहा 5 तारखेलाच कोलकाता येथून थेट मुंबईत दाखल होणार आहेत. 6 एप्रिलला दुपारी महामेळावा संपल्यानंतर बीकेसीतील एमसीए क्‍लबमध्ये ते मंत्री आणि आमदारांची बैठक घेऊन त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत मंत्री आणि आमदारांनी कोणती कामगिरी केली ते तपासले जाणार आहे. गेल्यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत प्रत्येक आमदारांशी वन टू वन चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी चाळीसपेक्षा जास्त आमदारांच्या कामगिरीबद्दल नाराजी प्रकट करीत त्यांना कामगिरी सुधारण्याचा सल्ला दिला होता; अन्यथा त्यांची तिकिटे कापण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थिती आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेतला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button