breaking-newsराष्ट्रिय

अभ्यास केला का विचारल्याच्या रागात विद्यार्थ्याकडून शिक्षिकेवर चाकूने वार

सुट्टीच्या काळात दिलेला अभ्यास केला का विचारल्याच्या रागात विद्यार्थ्याने शिक्षिकेवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणामधील सोनेपत येथील भिगण गावात हा प्रकार घडला आहे. विद्यार्थी ११ वीत शिकणारा असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सोमवारी हा प्रकार घडला.

सोमवारी सुट्ट्या संपल्यानंतर शाळा पुन्हा सुरु झाल्या. इंग्रजी विषय शिकवणाऱ्या ४५ वर्षीय मुकेश कुमारी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात दिलेल्या अभ्यासाची चौकशी करण्यास तसंच गृहपाठ जमा करण्यास सांगितलं. यावेळी एका विद्यार्थ्याने धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला केला.

घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना मुकेश कुमार यांनी म्हटलं की, ‘जेव्हा मी गृहपाठाची चौकशी केली तेव्हा त्याने बॅगेतून चाकू बाहेर काढला आणि माझ्यावर एकापेक्षा जास्त वार केले. तो कधीच गृहपाठ पूर्ण करत नाही’. गंभीर दुखापत झालेल्या मुकेश कुमारी यांना उपचारासाठी शहरातील सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण नंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूटमध्ये हलवण्यात आलं.

हल्ला केल्यानंतर विद्यार्थ्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या एका शिक्षकाने त्याला अडवलं. पोलीस याप्रकरणी तपास करत असून वैद्यकीय अहवाल मिळण्याची वाट पाहत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button