breaking-newsमनोरंजन
अभिनेता अरमान कोहलीकडून गर्लफ्रेंड मीनू रंधवाला मारहाण
बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉसमधील एक स्पर्धक अरमान कोहली याची गर्लफ्रेंड मीनू रंधवा हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अरमान कोहलीने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मीनूने आपल्या तक्रारीत केला आहे.
मीनू रंधवाने म्हटले आहे की, अरमानने केलेल्या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली आहे. पीडिता सध्या मुंबईतील कोकीळाबेन रूग्णालयात दाखल झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू असून, तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.