breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अबब… मोठा भाऊ पंतप्रधान, धाकटा राष्ट्रपती, एकाच घरात चार मंत्रिपदं, श्रीलंका सरकारचं घरचं मंत्रिमंडळ

कोलंबो: श्रीलंकेत एक कुटुंब आणि 8 मंत्रिपदं, मोठा भाऊ पंतप्रधान, धाकटा भाऊ राष्ट्रपती, मोठ्या भावाचा मुलगा क्रीडा मंत्री, तर लहान भावाचा मुलगा देशांतर्गत संरक्षण मंत्री झालेला आहे. हे श्रीलंका सरकारचं नवनिर्वाचित मंत्रिमंडळ आहे. लंकापती रावणाच्या थाटामाटालाही लाजवणारं हे वैभव राजपक्षे कुटुंबाच्या वाट्याला आलेलं आहे. अख्खी लंका रावणाची होती. मात्र, रावणातल्या दरबारी मंत्र्यांमध्ये सुद्धा वैविध्य होतं. पण, यंदाच्या निवडणुकीनंतर श्रीलंका देश हा राजपक्षे प्राईव्हेट लिमिटेड झाल्याची शंका निर्माण होत आहे.

महिंद्रा राजपक्षे हे स्वतः पंतप्रधान आहेत. पंतप्रधानाबरोबर त्यांच्याकडेच वित्त, शहर विकास आणि बौद्ध धर्माशी संबंधित विभागाचं खातं आहे.

गोटाबाया राजपक्षे हे श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानाचे धाकटे भाऊ आहेत. पण राष्ट्रपतीपदाबरोबरच गोटाबाया राजपक्षेंनी स्वतःकडे संरक्षण खातं सुद्धा ठेवलेलं आहे.

नमन राजपक्षे हे युवक कल्याण मंत्री आहेत. पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचे पुत्र आहेत. युवक कल्याणबरोबरच क्रीडा मंत्रालय सुद्धा नमन राजपक्षेंनाच दिलं गेलेलं आहे.

– चमल राजपक्षे हे राजपक्षे कुटुंबातली अजून एक फांदी. त्यांनाही देशांतर्गत सुरक्षेचं खातं मिळालं आहे.

– शिषेंद्र राजपक्षे हे चमल राजपक्षे यांचे पुत्र आहेत. यांच्या वाट्यालाही एक राज्यमंत्री पद आलं आहे.

हे मंत्रिमंडळाचं वाटप झालं? की एखाद्या मोठ्या खटल्यातल्या शेतीची वाटणी, याबाबत अनेकांना संभ्रम आहे. एकाच घरात आठ मंत्रिपदं, म्हणजे उद्या हे कुटुंब घरी संध्याकाळच्या जेवणाला जरी बसलं, तरी घरच्या-घरी कॅबिनेट मिटिंग उरकेल. ना कॅबिनेटमधले मतं-मतांतरं आडवे येतील आणि ना ही एकमेकांविषयी स्पर्धारंगेल.

श्रीलंकेत एकूण 225 जागा आहेत. त्यापैकी राजपक्षेंच्या कुटुबानं तब्बल 145 जागा जिंकल्या आहेत. विरोधी पक्ष औषधालाही उरलेला नाहीय. जर पाठिशी राक्षशी बहुमत असेल. तर घराणेशाहीच्या तलावारीत लोकशाही म्यान करता येतेय. याचं श्रीलंका हे चांगलं उदाहरण आहे. श्रीलंकेची लोकसंख्या जेमतेम दोन कोटींच्या घरात आहे. म्हणजे जवळपास आपल्या गोव्या राज्याइतकी पण राजपक्षे कुटुंबाने अख्खे सरकार प्रायव्हेट लिमिटेड का केलं. त्यामागचं कारण म्हणजे प्रचंड बहुमत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button