breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

अबब! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

कोल्हापूर |

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवार मध्यरात्री मोठी कारवाई केली. इचलकरंजी नजीक जयसिंगपूर येथील संभाजीनगर परिसरात पोलिसांनी महिलांच्या जुगार अड्यावर छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे.

विशेष म्हणजे जुगार अड्यावर पत्ते खेळणाऱ्या सर्व महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संबंधित महिलांवर खिसे कापणे, चोरी, यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सातही महिलांवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.सदरची कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख विकास जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत जयसिंगपूर पोलिसांनी देखील सहभाग घेतला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मीना किरण काळे (वय 40 रा. संभाजीनगर), छाया जगनू लोंढे (वय 30, रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली), हेमा धर्मेंद्र कसबेकर (वय 40 रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), सुरेखा राजू नरंदेकर (वय 40 रा. केर्ली सध्या टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), वर्षा इकबाल लोंढे (वय 35 रा. कोरोची), ज्योती नामदेव पाटील (वय 70 रा. समडोळी मळा जयसिंगपूर), बेबी दौलत शेख (वय 45 रा. संभाजीनगर झोपडपट्टी), अर्जुन कल्लाप्पा वसगडे (वय 53 रा. मंगेश्‍वर कॉलनी उचगाव) यांचा समावेश आहे. संभाजीनगर येथे एका घरात तीनपानी पत्याचा जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली. ही माहिती खरी की खोटी याची खातरजमा पोलिसांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button