breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अबब…पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठीतून ट्वीट

नवी दिल्ली | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) शिवछत्रपतींना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्वीट केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र लाखो लोकांना प्रेरित करत राहिल. पंतप्रधान मोदींनी एका फोटो पोस्ट केला आहे.

ज्यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करत असल्याचं दिसतं आहे. याच फोटोसोबत मोदींनी मराठीत ट्वीट केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे. ‘धैर्य, करुणा आणि सुशासन यांचे प्रतीक असलेल्या भारतातील थोर व्यक्तींपैकी एक अशा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..’ यावेळी पंतप्रधानांनी असंही म्हटले, शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र हे अनेक लोकांना प्रेरित करत राहिल.

यावेळी पंतप्रधानांनी ‘महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!’ असे मराठीत ट्वीट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button