breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमुंबई

अफवांना आळा बसण्यासाठी ‘व्हॉट्स अॅप’चे नवीन फिचर

नवी दिल्ली : सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक गोष्टी वेगाने सोशल मीडियावर वेगाने पसरतात. मात्र, यावर अफवाही तेवढ्याच वेगाने पसरत असतात. सोशल मीडियावरील अशा अफवा किती घातक ठरतात, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. म्हणूनच, ‘व्हॉट्स अॅप’ने अशा अफवांना अथवा खोट्या बातम्यांना आळा बसण्यासाठी युझर्ससाठी एक नवीन फिचर आणले आहे. या फिचरमुळे ‘व्हॉट्स अॅप’वर जास्त वेळा फॉरवर्ड होणाऱ्या मेसेजवर आता नजर राहणार आहे.

एखादा मेसेज २५ पेक्षा अधिक जणांना पाठवला, तर त्याचे ट्रॅकिंग करता येणार आहे. तसेच, अनेकांना एकच मेसेज पाठवला, तर ‘फॉरवर्डेड मेनी टाईम्स’ असा मेसेज युझर्सला ‘व्हॉट्स अॅप’वर येईल. विशेष म्हणजे, संशयास्पद मेसेज फॉरवर्ड करताना ‘व्हॉट्स अॅप’कडून इशाराही देण्यात येणार आहे. दरम्यान, ‘भारत बंद’च्या वेळी अनेक अफवा पसरवणारे मेसेज ‘व्हॉट्स अॅप’वर फिरत होते. यामुळे हिंसेला खतपाणी मिळून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button