breaking-newsआंतरराष्टीय

अफगानिस्तान हादरला..एकाच दिवशी दोन दहशतवादी हल्ले

काबुल : एका दिवसात अफगाणिस्तानमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. यातील एक हल्ला अफगाण मंत्रालयाबाहेर झाला असून या हल्ल्यांमध्ये एकूण २६ नागरिकांचा मृत्यु झाला आहे. तसेच ३५ जण गंभीररीत्या जखमी झाले असून मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान, हल्ल्यांची जबाबदारी तालिबानने घेतली आहे.

सोमवारी तालिबान्यांनी सर्वात प्रथम जलालाबाद येथे तैनात असलेल्या अफगाण लष्कराच्या एका तुकडीवर हल्ला केला. यामध्ये एकूण १५ सैनिकांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर  जखमी झाले. या हल्ल्याची बातमी देशभर पसरत असतानाच राजधानी काबुलमधील ग्रामीण विकास मंत्रालयाच्या इमारतीबाहेर तालिबान्यांनी दुसरा हल्ला केला. यामध्ये मंत्रालयाच्या बाहेर अतिरेक्यांकडून आत्मघातकी हल्ल्यामार्फत स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात एकूण ११ नागरिकांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button