breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानमध्ये सरकारी इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला

जलालाबाद (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील जलालाबादेतील सरकारी इमारतीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये किमान एक जण ठार झाला असून इमारतीतील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ओलिस ठेवले होते. तर अन्य भागात रस्त्यामध्ये पेरलेल्या बॉम्बच्या स्फोटामध्ये एका प्रवासी बसमधील किमान 11 जण ठार झाले.

जलालाबाद शहरातील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेली चकमक तब्बल 5 तास सुरू होती, असे नानगारहार प्रांताच्या गव्हर्नरांचे प्रवक्‍ते अत्ताउल्लाह खोग्यानी यांनी सांगितले. हा हल्ला झाला तेंव्हा इमारतीमध्ये स्थानिक शरणार्थींचे प्रतिनिधींबरोबर विदेशी देणगीदार आणि एजन्सीची बैठक सुरू होती. दहशतवादी हल्ल्यामुळे हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी इमारतीमध्येच अडकून पडले होते. त्या सर्वांना नंतर सोडवण्यात आले. यापैकी काहीजणांना दहशतवाद्यांनी काही काळ ओलिस ठेवले होते.

या चकमकीमध्ये 1 जण ठार झाला तर 14 जण जखमी झाले. हा हल्ला तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी केला होता. त्यापैकी एकाने प्रवेशद्वारापाशी आत्मघातकी स्फोटाने स्वतःला उडवून दिले. तर दोघे चकमकीत मारले गेले. या हल्ला केल्याचे तालिबानने नाकारले आहे. अन्य कोणत्याही संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तीनच दिवसांपूर्वी इसिसच्या दहशतवाद्यांनी जलालाबादेतील सुईणींच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला होता. त्यामध्ये तिघेजण ठार झाले होते.

पश्‍चिमेकडील फराह प्रांतात बॉम्बस्फोटाने एक बस उडवून दिली गेली. त्यात 11 जण ठार झाले. हा बॉम्ब सुरक्षा रक्षकांच्या बसला उडवण्यासाठी पेरला गेल्याचा संशय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button