breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्यात 30 सैनिक ठार

हेरात – अफगाणिस्त्गानमधील पश्‍चिमेकडील बागदघिस प्रांतात तालिबान्यांनी केलेल्या काही हल्ल्यांमध्ये 30 सैनिक ठार झाले आहेत. ईदच्या निमित्ताने तालिबानबरोबरची शस्त्रसंधी लागू असतानाच तालिबानी दहशतवाद्यांकडून हे हल्ले केले गेले आहेत. दहशतवाद्यांनी बालामेरघाब जिल्ह्यातील एका लष्करी तळावरही हल्ला चढवला. तर दोन चेकपोस्टवरही दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्यांपैकी निम्मे सैनिक रस्त्याच्या कडेला पेरलेल्या बॉम्बच्या स्फोटांमध्ये मरण पावले. तर उर्वरित सैनिक दहशतवाद्यांच्या गोळीबाराला बळी पडले, असे बगदघिस प्रांताचे राज्यपाल अब्दुल खफूर मलिकझाइ यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

बालामेरघाब इथे पहाटेच्या सुमारास एकाच वेळी मोठ्या संख्येने तालिबानी दहशतवादी वेगवेगळ्या दिशांमधून आले होते. त्यांनी लष्करी तळावर हल्ला चढवल्यावर दीर्घकाळ चकमक सुरू होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी या तळावर कब्जा मिळवला, असे प्रवक्‍त्याने सांगितले.

बागदगिस प्रांतात रात्रभरामध्ये अन्यत्र झालेल्या भीषण कारवायांदरम्यान 15 दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांनी शस्त्रसंधीच्या काळातच या भागाची पहाणी केली होती. मात्र या हल्ल्यांची जबाबदारी तालिबानकडून अद्याप घेतली गेलेली नाही. शस्त्रसंधीची मुदत आज (बुधवारी) संपणार होती. मात्र अध्यक्ष अशर्रफ गनी यांनी या शस्त्रसंधीला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button