breaking-newsपुणे
अपना वतन संघटनेतर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली
पिंपरी- अपना वतन संघटनेच्या वतीने जम्मू काश्मीर येथील सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबारामुळे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी ही श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यावेळी मेणबत्या पेटवून व मौन धारण करून भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
यावेळी संघटनेचे संपर्कप्रमुख हरिशचंद्र तोडकर, प्रवक्त्या सॅन्ड्रा डिसोझा, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, माजी नगरसेविका उषा चरोडिया, चिंचवड विभागप्रमुख फारुख शेख, फ्रान्सिस गजभिये, दीपक खैरनार, प्रशांत सपकाळ, संदीप पिसाळ, बी. आर. ग्रुपचे सतीश कदम, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, वैभव जाधव, वैभव गजधने, लोकशाही संस्थेचे अजय लोंढे, भारत मिरपगारे, सोमनाथ उमाप, अब्दुल शेख, हाजीमलंग शेख, विठ्ठल कांबळे, विशाल बोत्रे, तबरेज पठाण, सलीम शेख आदी उपस्थित होते.