breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अपंगाच्या विविध मागण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष ; प्रहार संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या तयारीत 

पिंपरी – शहरातील अपंग, दिव्यांगाच्या विविध मागण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कित्येक दिवसापासून अपंगाचे प्रश्नासंर्दभात चर्चा करायला महापालिकेला वेळ न मिळाल्याने प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी दिला. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आला. त्यात म्हटले आहे की, शहरातील अपंगाना सरसकट दोन हजार पेन्शन योजना द्यावी, अद्यावत अपंग भवन बांधावे, अपंगाना 50 टक्के मिळकत कर सवलत द्यावी, अपंग स्टाॅल धारकांना संरक्षण द्यावे,चलन वलन साहित्याएेवजी रोख रक्कम द्यावी, सर्व मार्गावर मोफत बस पास द्यावेत,घरकुल योजनेत 3 टक्के आरक्षण द्यावे,  अपंग कल्याणकारी समिती स्थापन करावी, यासह विविध प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच अपंगाच्या मागण्यावर बैठक घेण्याबाबत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक कैलास बारणे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button