breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…अन् मोठा अनर्थ टळला; पुणे-सोलापूर रस्त्यावरची घटना

पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. येथील मनाली हॉटेलसमोर सकाळी आठच्या सुमारास एका खासगी बसला आग लागली. चालकाच्या समयसुचकतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या अग्निशमन दलांच्या जवानांनी तातडीने आग विझवली.

सकाळी सोलापूरच्या दिशेने जाताना बसचा उजव्या बाजुचा मागील टायर फुटला. टायर फुटताच टायरने प्रथम पेट घेतला. टायरने पेट घेतल्याचे लक्षात येताच, बस चालकाने बस रस्त्याच्या एका बाजुला घेऊन, बस मधील प्रवाशांना खाली उतरवले. प्रवाशी बस मधुन खाली उतरत असतानाच, बसनेही मागील बाजुकडुन अचानक पेट घेतला. बसमधील प्रवाशी उतरले असले तरी, प्रवाशांचे खाण्यापिण्याचे साहित्य, प्रवाशी बॅग जळुन खाक झाली. बर्निंग बसचा हा थरार पाहून परिरातील ग्रामस्थ आणि बसमधील प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली. चालक आणि वाहकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने सर्व प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर उतरवले.

पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर 15 ते 20 मिनीटांमध्ये पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या. त्यांनी पाण्याचा मारा करत एका तासात आग विझवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button