breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…अन्यथा पुरुषांच्या व्यायामशाळेला टाळे ठोकु – सीमा बेलापूरकर

महिलांसाठी व्यायामशाळा सुरु करण्याची ‘मनसे महिला सेनेची’ मागणी  

पिपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

 

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात पुरुषांसाठी व्यायामशाळा सुरु केल्या आहेत. मात्र महिलांसाठी व्यायामशाळा सुरु केलेल्या नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिका दुजाभावाने वागताना दिसत आहे. त्यामुळे १५ दिवसात महिलांसाठी व्यायामशाळा सुरु करा, अशी मागणी मनसे महिला सेना भोसरी मतदार संघाच्या विभाग अध्यक्षा सीमा बेलापूरकर यांनी केली. अन्यथा पुरुषांच्या व्यायामशाळेला टाळे ठोकू, असा इशारा बेलापूरकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात दिला.

बेलापूरकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरात खेळासाठी आणि व्यायामशाळेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात. शहरातील ८२ व्यायामशाळांपैकी ५० व्यायामशाळा संस्था, मंडळे यासाठी चालविण्यास दिलेल्या आहेत. क्रीडा विभाग ३२ व्यायामशाळा चालवत आहेत. सध्या सुमारे ५ व्यायामशाळा बंद आहेत तर सुमारे ३ व्यायामशाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ८२ व्यायामशाळापैकी महिलांसाठी सुमारे ४ व्यायामशाळाचं का, असा सवाल बेलापूरकर यांनी उपस्थित केला आहे. सध्या मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, शारीरिक आजार, मासिक पाळी आदी प्रकारचे आजार ४५ वर्षानंतर सुरु होतात. 30 ते ३२ वर्षांच्या महिलांमध्येही हे आजार वाढत आहेत. मध्यम कुटुंबातील महिला व युवती या आजारांना बली पडत आहेत. तसेच त्या महागड्या व्यायामशाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे पुरुषांसाठी व्यायामशाळा आहेत त्याच प्रमाणात महिलांसाठी व्यायामशाळा असाव्यात. महिलांसाठीच्या व्यायामशाळेत प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक महिला असाव्यात. संस्था व मंडळांना व्यायामशाळा चालविण्यास दिल्या आहेत, तिथे पुरुषांन जेवढा वेळ आहे तेवढाच वेळ महिलांना असावा. शहरात महिला व्यायामशाळेची जनजागृती करावी. स्थानिक नगरसेवकांनी आपल्या भागात महिला व युवतींना व्यायामशाळा सुरु झाल्याची माहिती द्यावी. महिला व्यायामशाळासाठी लागणारे साहित्य सामुग्री दर्जेदार असावेत. चेंजिंग रूम आणि स्वच्छतागृह असावे अशी मागणी बेलापूरकर यांनी केली.

या मागण्यांची दखल न घेतल्यास पुरुष व्यायामशाळेला टाळे ठोकू असा इशारा, बेलापूरकर यांनी निवेदनाद्वारे दिला.

निवेदनावर अनिता पांचाळ, दक्षता क्षीरसागर, सुचित्रा वाघमारे, दुर्गा पवार आदींच्या सह्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button