breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अनाथांसाठी आमदार महेश लांडगे यांची दिवाळी भेट!

– तब्बल ३२८ विध्यार्थ्यांना चादर वाटप 
– ‘डब्ल्यूटीई’ कंपनीचा विधायक उपक्रम
पिंपरी- दिपावळीनिमित्त सामाजिक जाणिवेतून आमदार महेश लांडगे आणि ‘डब्ल्यूटीई’ सोशल फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथील मुलांना चादरवाटप करण्यात आले.
चिंचवड येथील क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या वतीने २००६ मध्ये पुनरुत्थान समरसता गुरुकुलम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दिपावळीनिमित्त चादरवाटप उपक्रमाचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे, ‘डब्ल्यूटीई’ इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे संचालक प्रसाद कुलकर्णी, गुरुप्रसाद टेलकर, प्रियांका आवटे, सचिन फोंडके आदी उपस्थित होते.
गुरुकुलमचे प्रमुख गिरीश प्रभुणे म्हणाले की, पारधी, भिल्ल, वडार, कैकाडी, कोल्हाटी, डोंबारी, लमाण, घिसाडी अशा वंचित घटकांसाठी निवासी गुरुकुल चालवले जाते. पहिली ते बारावीच्या शिक्षणासह पारंपरिक कला कौशल्यधारीत आधुनिक शिक्षणाचा मेळ घातला आहे. या आश्रमात सद्या ३३०विध्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. ‘डब्ल्यूटीई’ सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बंधीलकीतून आयोजित केलेला हा उपक्रम आदर्शवत आहे.
—————
‘किनारा’आश्रमातही मदत …
दरम्यान, तळवडे येथील किनारा वृद्धाश्रमातही आमदार महेश लांडगे आणि ‘डब्ल्यूटीई’ सोशल फाउंडेशनच्या वतीने चादर भेट देण्यात आल्या. या ठिकाणी ७५ ज्येष्ठ नागरीक वास्तव्यास आहेत. याप्रसंगी अरुण कुलकर्णी, रंगनाथ रणपिसे, हनुमंत सुरवसे आदी उपस्थित होते.
—————-
कंपन्यांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा…
आमदार लांडगे म्हणाले की, उद्योगनगरी पिंपरी- चिंचवडमध्ये अनेक कंपन्या आहेत. सामाजिक जाणिवेतून या कंपनीतील व्यवस्थापनाने वंचित घटकांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच, ‘सीएसआर’ च्या माध्यमातून महत्वाकांक्षी प्रकल्पांना मदत करावी.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button