breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘अनसंग वॉरिअर्स’च्या लढ्यामुळेच पिंपरी- चिंचवडकरांची कोरोनावर मात!

महापालिका आयुक्त  श्रावण हार्डीकर यांचे प्रतिपादन

शहरातील प्रातिनिधिक 25 कोरोना योध्यांचा सन्मान

– महापौर माई ढोरे, आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती

पिंपरी । प्रतिनिधी

‘अनसंग ‘वॉरीयर्स’ पुरस्काराने चांगल्या विचारांची देवाण- घेवाण करण्याचे काम केले. अधिकारी हे फक्त ‘सह्याजीराव’ म्हणजे सही करण्याचे काम करतात. मात्र लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि पाठपुराव्याने शहराचा विकास घडतो. प्रशासन आणि राजकारण यांनी सकारात्मक पद्धतीने घेतले, तर विकासाचा आलेख मांडता येतो. कोरोनाच्या काळात कोरोनामुक्त करण्यात यश मिळेल, असे मत महापालिका आयुक्त  श्रावण हार्डीकर यांनी व्यक्त केले.

चिखली, मोशी, चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशन, अविरत श्रमदान, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते. या वेळी महापौर माई ढोरे, आमदार महेश लांडगे उपस्थित होते.

आयुक्त  श्रावण हार्डीकर म्हणाले की, पिंपरीतील नागरिकांचा अभिमान वाटतो. कोरोनाच्या काळात भीतीचे वातावरण होते. मात्र एकजणही कामचुकार वागले नाहीत. या काळात अनेक अडचणी आल्या. आरोग्य विभागातल्या कर्मचार्यांना पिपिई किट सुरुवातीला मिळाले नाही. सुरक्षा रक्षक मिळाले नाही. या काळात खुप वाईट गोष्टी पहिल्या. मात्र शहरातील नागरिकांच्या प्रेमामुळे कोरोनामुक्त शहर झाले. कोरोना पूर्ण गेला नाही. या प्रकारचे अनेक संकटे येतील. त्याला तोंड देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना वॉरीयर्सचा सन्मान हा माझा सन्मान आहे. निसर्गाशी पंगा घेणे चुकीचे आहे. त्यामुळे निसर्गाला जपत कार्यक्रम घ्यावे लागतील. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पाठीमागे वळून पहिले तर १० महिने कोणी हसले नाही. कोरोनामुळे सगळे चिंतेत होते. मात्र, कोरोनावर आपण मात केली. त्यामुळे कोरोना योद्धे यांच्या विषयी बोलताना मला आनंद होत आहे. काम करत असताना दरम्यानच्या काळात मलाही  कोरोना झाला. सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. जवळच्या सर्वांनी मला फोन करून आधार दिला. त्यानंतर सर्वच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कोरोना काळात वेळ इतकी वाईट होती की, माझ्या घरच्यांना नंतर कोणी फोनही केले नाही. माझ्या घराच्या बाहेर कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याचा फलक लावला. गल्लीतील रस्ताही बंद केला. अशी वेळ इतरांवर येऊ नये, दुसऱ्याचे मनोबल वाढावे म्हणून दुसर्या दिवशी मी फेसबुकला सांगितले की, कोरोना झालेल्या प्रत्येक रुग्णांच्या घरच्यांना आधार द्या. त्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. प्रत्येक जण कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांच्या घरच्यांना आधार देत होते. प्रत्येक तासनतास काळजीने चौकशी करत होते. त्यामुळे लोकांचे मनोबल उंचावले. त्या आधार देणाऱ्या नागरिकांचा मला अभिमान असल्याचे आमदार लांडगे म्हणाले. आयुक्त हर्डीकर यांच्याविषयी बोलताना आमदार लांडगे म्हणले की तुमचे काम कोणीही विसरू शकत नाही. आयुक्तांनी समतोल राखून काम केले. लोकांना आधार दिला.

महापौर माई ढोरे म्हणाल्या की, कोरोना योध्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम तो कौतुकास्पद आहे. शहरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण होते. सर्वत्र स्मशान शांतता होती. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी अधिकारी ते सफाई कामगार सर्वच कामात होते. आमदार यायचे. विकास नाही झाला तरी चालेल. मात्र २५ लाख लोकांचा जीव महत्वाचा मानला. विकास नंतर करता येतो. हा सर्वसमावेशक निर्णय झाला. त्यानंतर १० महिने लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले. घरात राहा असे आवाहन केले. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे सिंहाचा वाटा सर्वच लोकांचा आहे. बाहेर फिरणाऱ्या लोकांना कोरोना झाला. क्वारंटाईन सेंटर मध्ये गर्दी होती. अनेक वेळा गैरसोयीचा नागरिकांना सामना करावा लागला. मात्र तरीही कोरोना मुक्त शहर करून दाखविले. चिखली परिसराचा आमदार महेश लांडगे यांनी विकास केला. आणखी पुढे शहराच्या विकासासाठी निधी नाही म्हणू नका, अशी मागणी या वेळी महापौर माई ढोरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना या वेळी केली.  

 पैलावानामधील संवेदनशील माणूस दादांच्या रूपाने दिसला…

माणसातला माणूस ओळखण्याचे सामर्थ्य असायला पाहिजे. हे सामर्थ्य निर्माण झाल्यास शहर आपोआपच स्मार्ट बनत जाते. विकासासाठी नागरिकांचे मन खुले असावे लागते. पिंपरी- चिंचवड शहरातील कोरोना योद्धे यांचा सन्मान करण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले. त्यांची ओळख पैलवान आमदार अशी आहे. मात्र आज त्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे पैलवानातला संवेदनशील असलेला माणूस दिसला, अशा  भावना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केल्या.  

कोरोना योध्यांचे काम सिमेवरील जवानासारखे : आमदार महेश लांडगे

कोरोनातून बरा झालो म्हणून अनेक जणांनी कोरोना योद्धा म्हणून माझाही सत्कार केला. मात्र ज्यांनी स्वताची व घराची काळजी न करता ज्यांनी काम केले ते खरे कोरोना योद्धे आहेत. जवळ न जाणाऱ्या लोकांजवळ हि लोक गेली. सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकासारखे काम शहरातील कोरोना योद्ध्यांनी केले. गोळी लागणार हे माहित असताना देखील आपले जवान देशसेवा करतात. तसेच कोरोना योद्ध्यान्ही काम केले. सोडून गेलेल्या लोकांचे स्मरण आणि काम आठवत असल्याचे आमदार महेश लांडगे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button