breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…आता आमदार जगताप कोणत्या पक्षामध्ये जाणार?; प्रशांत शितोळेंची घणाघाती टिका

पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटल्याचे जाहीर करून भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनी जल्लोष केला. शास्ती कराचा प्रश्न सुटल्याचे मुख्यमंत्र्यांनी शहरात येऊन स्वतः सांगितले. याच दोन्ही प्रश्नांवरून आमदारकीचा राजीनामा देणा-यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत पक्ष बदलला. तरीही, हे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. आगामी निवडणुकीत ते कोणत्या पक्षात जाणार? असा टोला राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत लगावला.

महापालिकेच्या सामाजिक अधिकारिता शिबिराच्या कार्यक्रम पत्रिकेत पदाधिका-यांची नावे छापताना प्रोटोकॉल न पाळल्यामुळे विरोधकांनी शुक्रवारी (दि. 25) पत्रकार परिषद घेऊन भाजपचा निषेध केला. यावेळी शितोळे यांनी ही टिका केली. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, सेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले आदी उपस्थित होते.

शितोळे म्हणाले की, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार जगताप यांनी विधानसभेचा राजीनामा दिला होता. तत्कालीन माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी तो मंजूर केला होता. अनधिकृत बांधकाम आणि शास्ती करासह प्रलंबित प्रश्न आघाडी सरकारने सोडविले नाहीत. म्हणून जगताप यांनी या प्रश्नांसाठी पक्ष बदलला. आता भाजपचा कार्यकाळ अवघा एक वर्षाचा राहिला आहे. तरीही, प्रलंबित प्रश्न काही सुटेलेले नाहीत. त्यामुळे ही जनतेची फसवणूक आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष बदलणारे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षात जाणार आहेत, याकडे आमचे लक्ष लागले आहे, असा टोला शितोळे यांनी लगावला. खोटी आश्वासने देता देता भाजपचा कार्यकाळ संपत आला आहे, असेही शितोळे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button