breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अत्याचाराच्या निषेधार्त वाकड पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

पिंपरी – उत्तरप्रदेशातील उन्नाव ,जम्मू काश्मीर मधील कठुवा व गुजरात मधील सुरत या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी देश हादरला आहे. स्त्रीला सन्मान व मातेचा दर्जा दिल्या जाणाऱ्या भारतीय संस्कृतीला अशा घटनांमुळे व काही नराधमांच्या निर्दयी कृत्यांमुळे गालबोट लागले आहे. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करावी अशा सत्ताधारी पक्षाचे काही नेते अशा घृणास्पद  घटनांचे  समर्थन करीत आहेत. त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली  आज वाकड चौक येथे निदर्शने करून या घटनेचा निषेध करण्यात आला.
वाकड चौक ते वाकडरोड मार्गे वाकड पोलीस स्टेशनवर मार्च काढण्यात आला. त्याठिकाणी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये सर्व घटनांमधील आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी, व अशा सामूहिक बलात्काराच्या घटनांसंदर्भात कडक कायदा अमलात आणावा, अशा मागण्यांचे निवेदन वाकड पोलिसांमार्फत राष्ट्रपती भारत सरकार, जम्मू काश्मीर, गुजरात, उत्तरप्रदेशच्या राज्यपालांना पाठविण्यात आले.
यावेळी घोषणांनी संपूर्ण वाकड परिसर दणाणून गेला. या आंदोलनामध्ये संघटनेचे कार्यध्यक्ष राजू शेरे, शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, चिंचवड विभागप्रमुख फारुख शेख, परिवर्तनवादी संघटनेचे इम्रानभाई शेख, जमत उलेमाये हिंदचे हाजी गुलजार शेख, शेतकरी कामगार पक्षाचे नाना फुगे, अखिल भारतीय छावा संघटनेचे धनाजी येलकर पाटील, संभाजी ब्रिगेड चे सतीश काळे, वैभव जाधव, शिव व्यापारी सेनेचे युवराज दाखले, योद्धा फाउंडेशनचे साकी गायकवाड, नितीन पाटेकर, मुजफर इनामदार, गणेश हिंगडे, विशाल वाघमारे, मसूद शेख, आकाश कांबळे, संदीप पिसाळ, संतोष शिंदे, पूजा सराफ, संगीत शहा, बेटींना दास आदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button