breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अतिरिक्त वैद्यकीय अधिका-यांकडून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

  • संपादक कुंदन ढाके यांच्या निधनानंतरही दुर्गाटेकडीकडे दुर्लक्ष
  • वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास केली जातेय टाळाटाळ

पिंपरी / महाईन्यूज

दुर्गाटेकडी येथे मॉर्निंग वॉकला येणा-या नागरिकांची संख्या पाहता याठिकाणी कायमस्वरुपी अत्यावशक वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याची मागणी भाजपाचे नेते तथा अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली होती. यासंदर्भात तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वैद्यकीय विभागाला आदेश दिले होते. मात्र, त्याला वैद्यकीय विभागातील अधिका-यांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दुर्गाटेकडी परिसरात दररोज मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांची गर्दी असते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, मध्यमवर्गीय व तरुणांचा सहभाग असतो. याठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना 28 फेब्रुवारी 2020 रोजी दैनिक जनशक्ती वृत्तपत्र समुहाचे संपादक कुंदन ढाके हे भोवळ येऊन जमिनीवर कोसळले. वैद्यकीय उपचार सुरू करण्यास काहीसा उशीर झाला. दरम्यान, वैद्यकीय अहवालात –हदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अशी वेळ कोणावर येऊ नये, यासाठी या ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याची नितांत गरज असल्याचे लक्षात येताच अमित गोरखे यांनी आयुक्तांना पत्र दिले. याठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती.

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या मागणीची दखल घेऊन वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना आदेश दिले. याठिकाणी शक्य तेवढ्या लवकर सकाळी सहा ते नऊ या वेळेत एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीम उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर डॉ. साळवे यांनी सुरूवातीच्या काळात ही सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, कालांतराने त्याकडे दुर्लक्ष होत गेल्याने आजरोजी त्याठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशालाही डॉ. साळवे यांनी केराची टोपली दाखविली आहेत. याठिकाणी येणा-या नागरिकांना जर धोका झाला तर वैद्यकीय विभाग याची जबाबदारी घेईल का ?, असा प्रश्न गोरखे यांनी उपस्थित केला आहे.

—————

आयुक्तांनी वैद्यकीय विभागातील संबंधित अधिका-यांना याठिकाणी रुग्णवाहिका आणि डॉक्टर्स टीम उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. याला दोन महिने उलटून गेले तरी याठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली गेली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वैद्यकीय विभागातील संबंधित अधिका-यांना नागरिकांच्या आरोग्याविषयी गांभिर्य नसल्याचे यावरून दिसून येते.

अमित गोरखे, प्रदेश सचिव, भाजपा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button