breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

अण्णांच्या जीवाशी खेळू नका – उध्दव ठाकरे

मुंबई – जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांच्या उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा जाहीर दर्शविला आहे.

अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी. अण्णांचे प्राण महत्त्वाचे असून सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी अण्णांच्या ‘आमरण उपोषणास’ शुभेच्छा देणारे पत्र पाठवावे हा प्रकार संतापजनक, तितकाच हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button