breaking-newsमनोरंजन

अटकपूर्व जामीनासाठी रिया चक्रवर्तीची धाव

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं महिन्याभरापूर्वी मुंबईतील त्याच्या राहच्या घरी आत्महत्या केली. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर अनेक अनुत्तरित प्रश्नांनी डोकं वर काढलं. ज्याअंतर्गत मुंबई पोलिसांनी काही मोठ्या सेलिब्रिटींची चौकशीही केली. त्यातच आता सुशांतच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसांत धाव घेत सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआरयार दाखल केली आहे. ज्यामुळं तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रियावर एफआयआर दाखल झाल्याचं कळताच बिहार पोलिसांनीही कारवाईसाठी पुढील पावलं उचलत मुंबई गाठली. या सर्व घडामोडी पाहता आता रिया चक्रवर्ती हिनं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केल्याचं कळत आहे.

रियानं सुशांतची फसवणूक केल्याच्या संशलयायवरुन आणि त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली. सुशांतच्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली असून, यामध्ये तिनं सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दुरावल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button