Uncategorized

अजित सिंहांनी मर्यादा ओलांडली, पंतप्रधान मोदींवर केली वादग्रस्त टीका

लोकसभा मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतशी प्रचारात रंगत वाढत आहे. अनेक मोठे नेते भाषणबाजी करताना मर्यादा ओलांडत असल्याचे दिसत आहेत. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह यांनी कहरच केला असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अश्लाघ्य शब्दांचा वापर केला आहे. ‘पंतप्रधान मोदी हे खोटं कधी बोलतात, ते खोटं बोलत नाहीत. फक्त त्यांनी आतापर्यंत खरं कधीच बोललेलं नाही. ते मुलांना सांगतात खरं बोला. मात्र, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना खरं बोलण्यास शिकवलेलं नाही. मोदी महिलांच्या बाजूने बोलतात. तिहेरी तलाकबाबत बोलतात. पण आपल्या पत्नीला त्यांनी एकदाही घटस्फोट दिला नाही आणि त्यांना सोडूनही दिलं,’ अशा शब्दांत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

एम्बेड केलेला व्हिडिओ

ANI UP

@ANINewsUP

RLD Chief Ajit Singh on PM Modi: Ye jhoot nahi bolta..bas isne aaj tak sach nahi bola.Bacchon ko kehte hain sach bola kar,lekin iske Ma baap ne nahi sikhaya.Mahilaon ka pakshdhar hai,teen talaq teen talaq..apni patni ko ek baar bhi talaq nahi bola aur chhod diya (3.4.19)

८३६ लोक याविषयी बोलत आहेत

अजित सिंह यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता यावर भाजपा काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत एकाही पक्षाकडून प्रचारात मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील अनेक दिग्गज राजकारण्यांवर वैयक्तिक टीका केल्याचे दिसून आले आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे आज (गुरुवार) केरळमधील वायनाड येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावर भाजपा नेत्या आणि अमेठी मतदारसंघातील उमेदवार स्मृती इराणी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी अमेठीतील लोकांना अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button