breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अखेर सेना गटनेते राहूल कलाटे यांनीही केला 647 कोटींच्या निविदेला विरोध

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी शहरातील रस्त्यांची यांत्रिक पध्दतीने साफसफाई करण्यासाठी 647 कोटी रुपयांची निविदा काढली. त्याला विरोधकांनी तत्क्षणी विरोध केला. आता शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी देखील ही निविदा थांबविण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची 8 क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्याअंतर्गत मुंबई-पुणे या दुतर्फा महामार्गाची 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्यात येणार आहे. या कामाची सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 7 वर्ष कालावधीसाठी 647 कोटी रुपयांची निविदा काढली. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपने ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन नियम व अटी-शर्ती बनविल्याचा आरोप कलाटे यांनी केला. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना संघटिका सुलभा उबाळे यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली. आता शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी देखील मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे.

कलाटे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, यांत्रिक पध्दतीने रस्ते सफाईची निविदा प्रक्रिया राबविताना नियम, अटींमध्ये बदल केले आहेत. महापालिका आयुक्त, प्रशासन, पदाधिका-यांबाबत चुकीचा संदेश नागरिकांमध्ये गेला आहे. ही निविदा राबविल्यामुळे महापालिकेचा आर्थिक फायदा होईल, असे भासविले जात आहे. परंतु, हे खोटे आहे. ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेऊन अटी-शर्ती बदलण्यात आल्या आहेत. सहा पॅकेजसाठी सहाच ठेकेदार आलटून-पालटून आहेत. त्यामुळे रिंग होण्याची दाट शक्यता आहे. यातून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होणार आहे.

याशिवाय 1100 कामगार बेरोजगार होणार आहेत. केवळ सत्ताधारी भाजपच्या हट्टापायी पुणे महापालिकेत अयशस्वी ठरलेला प्रयोग पिंपरीत राबविला जात आहे. भ्रष्टाचाराच्या हेतूने हा सर्व प्रकार सुरू आहे. ही निविदा राबविताना ज्या अधिका-यांनी ठेकेदारांचे हित जपले, भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. त्या अधिका-यांवर कडक कारवाई करावी. ही निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी कलाटे यांनी निवेदनातून केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button