breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अखेर वादग्रस्त कचरा निविदा रद्द

आठ प्रभागात नव्याने निघणार निविदा

पुन्हा एकदा माजी सभापतींना दणका

पिंपरी- महापालिकेने कचरा संकलन व कचरा वाहतूक कामासाठी काढलेली वादग्रस्त निविदा रद्द करण्यात आली. यामुळे माजी स्थायी समिती सभापतींना दणका दिला आहे. नव्याने आता आठ प्रभागनिहाय निविदा मागविण्यात येणार आहे. याबाबत बुधवारी (दि.10) स्थायी समितीने निविदा रद्द करुन शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी दिली. 

पिंपरी – चिंचवड शहराच्या आठ प्रभाग क्षेत्रातील कचरा गोळा करणे, त्याची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम पालिकेने ए. जी. इनव्हायरो इंन्प्रा प्रोजेक्टस आणि बीव्हीजी इंडीया या कंपनीला दिले होते. यासाठी वार्षिक 56 कोटींचा खर्च येणार होता.  हे काम  आठ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले होते. ठेकेदाराला दरवर्षी निश्चित स्वरुपात दरवाढ देण्यात येणार होती.

पुर्वीप्रमाणे प्रभागनिहाय कंत्राट न देता पिंपरी – चिंचवड शहर दोन भागात विभागण्यात आले होते. शहराचे दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभाजन करण्यात आले होते. दक्षिण विभागाचे काम ए. जी. इनव्हायरो इंन्प्रा प्रोजेक्टस यांना 28 कोटी 52  लाख रूपये आणि उत्तर विभागाकरिता बीव्हीजी इंडीया यांनी 27 कोटी 90  लाख रूपये लघुत्तम दरात काम दिले गेले होते.

दरम्यान, स्थायी समितीमध्ये निविदा मंजूर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेने विरोध केला.  तसेच या निविदेसाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर कमालीचे आग्रही होते. परंतु, सत्ताधा-यांनी ही निविदा रद्द करुन माजी समिती सभापतींना चांगलाच धक्का दिला आहे. आता प्रभागनिहाय निविदा काढण्याचे प्रस्तावित आहे. निविदा कार्यवाही पुर्ण होईपर्यंत कचरा उचलणे व वहन करणा-या विषयांना पुर्वीच्या ठेकेदारांना मुदतवाढ दिली असल्याची माहिती स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button